Sunday, January 30, 2011

तुम्ही एक घटना.. माझ्या मनाची रचना..
आठवत ते buzz  वर अनेक विषयांवर झालेला कल्लोळ..
अन अधून मधून होत असलेल्या कवितेची ओळ..
आठवत भांडणांना वादांना अचानक जोर येण..
अन एकमेकांना personal chat वर समजून सांगण..
आठवत एकदा तरी भेट व्हावी म्हणून केलेला plan ..
त्यासाठी निवडून दिलेले main..
आठवत तो पुणे-मुंबई प्रवास..
एकमेकांना भेटणे हाच होता आमचा अट्टाहास..
आठवत तो उद्यान गणेश मंदिराचा परिसर..
सगळ्यांची वाट बघण्यात मारलेले फेरे चार..
आठवत ती मुंबईच्या गल्ल्यामधली सहल..
अन हसत खेळत पार केलेला सेमेंटच्या दगडांचा महल..
या सगळ्या आठवणीत मी तुम्हाला कशी विसरू..
तुम्ही एक घटना.. माझ्या मनाची रचना..
आता समजून घ्या माझ्या भावना..
हीच माझी मनोकामना....ऋणानुबंध..

कधीतरी कोणीतरी असाच वाटेत भेटत..
अन ते भेटलेल वाटसरू अचानक आपलस होत..
नसताच मुळी ते नात रक्तच..
ते तर असत प्रेमच अन जिव्हाळ्याचं..
कदाचित असेल ते ऋण पूर्वजन्मीचे..
बंध हे रेशीम धाग्यात बांधले जातात..
म्हणूनच ते जपायचे असतात..
असेच जपू आपण आपले हे "ऋणानुबंध"..


!!!!धन्यवाद!!!!
अर्जुन, प्राची, प्रणिता, अतुल, अमर, निवेदिता, गणेश, कल्पेश, स्नेहा,  मंदार, निलेश, प्रीती

-वैशाली ओटवणेकर

कोर पानं..


Thursday, January 27, 2011

नाही..


माझ्याबद्दल मी स्वतः तुम्हाला काय काय सांगू?


माझ्याबद्दल मी स्वतः तुम्हाला काय काय सांगू? 
तिखट आहे कि दुधावरची साय सांगू?
वसंतासम सोनेरी रूप सजलेलं सांगू?
की आसमानी डोळ्यात स्वप्न भिजलेल सांगू?
माझं रुसण, गालात हळूच हसण सांगू?
वेड वेडपण सांगू कि कोवळेपण सांगू? 
अल्लडपनाचा माझ्या असलेला कहर सांगू?
की आई सारखी करडी नजर सांगू?
इवल्याश्या गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगू?
की भरल्या डोळ्यांनी हसणारे ध्यान खुळे सांगू?
माझ्या विचारांना नसलेली हद्द सांगू?
की सहज राखली जाणारी सरहद्द सांगू?
स्वतःशी मारलेल्या गप्पांमध्ये क्षण किती हरवलेले सांगू?
की सहज गप्पांमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगू?
सगळ्याहून न्यारी पण गोड माझी रीत सांगू?
की माझ्या सारखा नमुना लाखात एकच हे गुपित सांगू?