Thursday, January 27, 2011

माझ्याबद्दल मी स्वतः तुम्हाला काय काय सांगू?


माझ्याबद्दल मी स्वतः तुम्हाला काय काय सांगू? 
तिखट आहे कि दुधावरची साय सांगू?
वसंतासम सोनेरी रूप सजलेलं सांगू?
की आसमानी डोळ्यात स्वप्न भिजलेल सांगू?
माझं रुसण, गालात हळूच हसण सांगू?
वेड वेडपण सांगू कि कोवळेपण सांगू? 
अल्लडपनाचा माझ्या असलेला कहर सांगू?
की आई सारखी करडी नजर सांगू?
इवल्याश्या गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगू?
की भरल्या डोळ्यांनी हसणारे ध्यान खुळे सांगू?
माझ्या विचारांना नसलेली हद्द सांगू?
की सहज राखली जाणारी सरहद्द सांगू?
स्वतःशी मारलेल्या गप्पांमध्ये क्षण किती हरवलेले सांगू?
की सहज गप्पांमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगू?
सगळ्याहून न्यारी पण गोड माझी रीत सांगू?
की माझ्या सारखा नमुना लाखात एकच हे गुपित सांगू?


10 comments:

Vinay Bhutada said...

Hey...this is the best blog i hv ever seen...thanx 4 this :)

shailesh ambre said...

superb.........................

Chetan Pagare said...

Very nice poem Vaishali!!! keep it up..

savita said...

Wow! superb..keep it up darling..:)

Vaidehi .... said...

sahi...

इंद्रधनू said...

sahiiiiiiiiiiiii

The Nivedita Patil said...

very nice

Anant Mahadev Ujagare said...

tuch tharaw tula kay sangaychay te,baki kavita zakkas aahe

Vaishali Otawanekar said...

Thankuuuuuu all..:):):):)

Manvesh Sathe said...

अप्रतिम कविता कस काय एवढ सुचत खरच
hatts off....

Post a Comment