Saturday, February 7, 2015

हुंदक्यांचा स्वर..

काही वाटतं बोलावं, काही लिहावं मनातून..
कधी उतरू पाहणार्या शब्दांतून..
तर कधी डोळयातून वाहणार्या अश्रूतून..

हरवून जात आहेत आठवणीतील जपलेले क्षण..
रित्या मनाने सावरू तरी कसे उरलेले कण..

उधळले जात आहे रंगवलेले डाव..
कसे सोसू आता आपलेच घालतायत घाव..

विसरून चाललीय जीवनचा ताल सूर..
कंठात फक्त उरलाय आर्त हुंदक्यांचा स्वर..

--वैशाली (20-11-2014)

0 comments:

Post a Comment